लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर : सध्या मालेगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरातील कोरोना रु ग्णाची संख्या ३२४ पर्यंत पोहोचली आहे. याचा परिणाम तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवून आला आहे.शेतकामे वगळता कुणीही बाहेर निघत नाही, तर बाहेरगावातील नागरिकांना प्रत्येक गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वडनेरसारख्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात पूर्णपणे लॉकडाउन नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्धारित वेळेत किराणा व दवाखाने मेडिकल सुरू असतात तर बाकी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.शासनाच्या नियमांचे प्रामुख्याने ग्रामीण भागात काटेकोर पालन केले जात आहे. सकाळी मजूर शेतात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत शेतशिवारातील कामे करत आहेत. मालेगाव शहरात कोरोना सर्वच भागात पाय पसरवत आहे. यामुळे ग्रामीण भागात येऊ नये याकरिता गावातून कोणी मालेगाव जाते का व मालेगावहून गावात येते का? याकडे गावकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत असून, गावात प्रत्येकाची घरे बंद दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी शेतात राहण्याची सोय आहे,असे शेतकरी शेतात राहण्यास गेले आहेत.अनेक गावांच्या सीमा बंदसध्या शहरात सर्वच भागात कोरोना आपले पाय पसरवत आहे. कॅम्प, सोयगाव, हिंमतनगर भागातही रु ग्ण मिळून आल्याने याचा मोठा परिणाम ग्रामीण भागात झाला आहे. या भागात नोकरी व इतर कामानिमित्त शहरात राहत असलेली अनेक कुटुंबे वाढत्या रु ग्णसंख्येची धास्ती घेत गावखेड्यातील आपल्या घराकडे राहण्यास निघाले आहेत.अशा कुटुंबाकडे गावकºयांचे लक्ष आहे. एकीकडे शहरात लोक भाजीपाला घेण्यासाठी बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. याउलट ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारे भाजीपाला घेण्यासाठी नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. नागरिक भाजीपाला व इतर कामानिमित्त बाहेर निघत नाहीत. अनेक गावांच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. गावात पूर्णपणे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ अजंग, खाकुर्डी, पाटणे, दाभाडी आदी गावांमध्ये सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आले आहे.
ग्रामीण भागात वाढली धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:08 IST
वडनेर : सध्या मालेगाव शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आलेल्या अहवालानुसार मालेगाव शहरातील कोरोना रु ग्णाची संख्या ३२४ पर्यंत पोहोचली आहे. याचा परिणाम तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवून आला आहे.
ग्रामीण भागात वाढली धास्ती
ठळक मुद्देकोरोना : शेतकामे वगळता सर्वच व्यवसाय ठप्प