चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:18 IST2020-09-07T21:19:27+5:302020-09-08T01:18:21+5:30
चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले
चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लॉकडाऊन काळात विजेची बिले आल्यानंतर आॅगस्ट महिन्याचे व्यावसायिक बिले महावितरणने अदा करताना त्यात मागचा स्थिर आकार चालू महिन्याच्या देयकांत लावून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक ग्राहकांला मागील महिन्याचा स्थिर आकार ४०० रुपये असताना यावेळच्या बिलात ५५१ रुपये लागून आले. त्यामुळे रक्कम मोठी फुगल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागच्या महिन्यात हा स्थिर आकार लावलेला असता ही रक्कम वाढली नसती त्यात मागील स्थिर आकार बिलात घेतला आहे कारण जी समायोजित रक्कम दिली आहे त्यामुळे एरव्ही १२०० ते १३०० रुपये येणारे बिल या महिन्याला २२०० रुपयापर्यंत आल्याने कंपनीने तातडीने वीज देयकाची योग्य आकाराणी करून् देयक पाठवावे.