वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:08 IST2020-08-07T23:10:43+5:302020-08-08T01:08:28+5:30
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील वैतरणानगर येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, उंचावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरामध्ये गेल्या ४८ तासांमध्ये दिलासादायक पाऊस झाल्याने अप्पर वैतरणा धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
जुलै महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये वाढ होत नव्हती, मात्र गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्याने कमालीची वाढ होत आहे. गेल्या ४८ तासांत १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वैतरणा धरण ४७ टक्के भरले आहे. वैतरणा धरणाचा एकूण जलसाठा ११,७०० दशलक्ष घनफूट असून, सध्या धरणात ५५०० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला असून, राहिलेल्या आवणीच्या कामाला वेग येणार आहे. इगतपुरी तालुक्यात भात पिकाची आवणी झाल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने भातपीक वाया जाण्याची शक्यता होती; परंतु संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. वैतरणा परिसर पर्यटकांना पावसाळ्यामध्ये नेहमीच खुणावत असतो, मात्र जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरवली होती. परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत तर डोंगरावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. संपूर्ण परिसराने धुक्याची चादर पांघरली आहे.