ठाणगाव येथील उंबरदरी धरणातील पाणी साठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 17:40 IST2019-07-11T17:40:15+5:302019-07-11T17:40:27+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या संततधार पावसाने ठाणगाव येथील उंबरदरी धरण निम्मे भरले. यामुळे ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेला जीवदान मिळाले.

ठाणगाव येथील उंबरदरी धरणातील पाणी साठ्यात वाढ
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या संततधार पावसाने ठाणगाव येथील उंबरदरी धरण निम्मे भरले. यामुळे ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेला जीवदान मिळाले.
धरणातील साठा कमी झाल्याने दिवसाआड पाणी ठाणगाव, पाडळी, हिवरे, पिंपळे, टेंभूरवाडी या गावांना दिले जात होते. उंबरदरी धरण निम्मे भरल्याने या गावांचा पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होणार आहे. सरासरीच्या तुलनेत या परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात येणारे पाण्याचे सत्रोत कमी झालेले आहेत. मात्र, म्हांळुगी नदीच्या उगमक्षेत्रावर पाऊस सुरूच असल्याने नदीला पहिला पूर येऊन गेला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीकामाला सुरवात केली आहे.