शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:29 IST

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख ...

ठळक मुद्देदारणा धरणातून ७४०८ क्युसेसचा विसर्गइगतपुरीत संततधार ९०.०८ टक्के विक्र मी पावसाची नोंद भात पिकांसाठी पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडीभरुन वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या संततधारेमुळे ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून गुरूवारी (दि.१३) ७४०८ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. दिवसभरात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर २३०५ मिमी विक्र मी पाऊस नोंदविला गेला आहे. तर वार्षिक सरासरीच्या ९०.०८ टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून ७४०८ क्यूसेक तर मुकणे धरणातून ७८१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असुन पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दहा आठवठ्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात पाणी साचून नदी-नाले दुथडी भरु न वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणा धरणा बरोबरच मुकणे धरणाच्याही विसर्गात वाढ करण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.प्रतिक्रि या...धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सरासरीच्या तुलनेत धरण भरले असल्याने सद्यस्थितीत सुरु असलेला पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याचे पाण्यामुळे सरासरीच्या तुलनेत धरण भरायला वेळ लागणार नाही.- सुरेश जाचक, शाखा अभियंता दारणा धरण.(फोटो १३ नांदूरवैद्य)इगतपुरी तालुक्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सततधारेने दारणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग करण्यात आला.

टॅग्स :RainपाऊसDamधरण