ब्राह्मणगावी कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 13:49 IST2020-12-21T13:46:35+5:302020-12-21T13:49:04+5:30
ब्राह्मणगाव : परिसरात कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळले असून थंडीत मोठी वाढ झाली आहे.मधल्या काळात भाजीपाला पिकाच्या लागवडीत वाढ झाली होती मात्र भाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. परिणामी, भाजीपाला पिकाकडे दुर्लक्ष करुन आता कांदा पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

ब्राह्मणगावी कांद्यापाठोपाठ ऊस लागवडीत वाढ
कांदा पिकाचा उत्पादन खर्च वाढला असून यावर्षी मजुरांच्या दरामध्येही वाढ झाली आहे मात्र कांदा पीक हे शेतकऱ्यांचे आर्थिक आधाराचे पीक असल्याने कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अवकाळी पावसाने दोन वेळेस कांदा रोपांचे मोठे नुकसान केले तरीही शेतकऱ्यांनी उभारी घेत नवीन महागडी बियाणे उपलब्ध करीत कांदा रोपाचे जतन केले .मात्र दर आठ दहा दिवसात वातावरणात बदल घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून मार्ग काढावा लागत आहे. निसर्ग संकटात शेतकऱ्याने लाखोंचे नुकसान झाले असूनही शासनाकडून भरपाई मात्र तीन ते चार हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजी पसरली आहे.