रमजान ईदनिमित्त पोलीस बंदोबस्तात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:39 IST2019-06-05T00:38:36+5:302019-06-05T00:39:53+5:30
मालेगाव : बुधवारी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद उत्साहात व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.

रमजान ईदनिमित्त पोलीस बंदोबस्तात वाढ
मालेगाव : बुधवारी होणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर खोट्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद उत्साहात व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.
रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दींमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. स्थानिक पोलीस यंत्रणेसह बाहेर गावाहून पोलीसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. यात दोन पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक, ३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, दोन केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, बॉम्बशोधक पथक, ३०० पुरूष व ६५ गृहरक्षक दलाच्या महिला, वरुण वाहन, वज्रवाहन असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, ५ व्हिडीओ कॅमेरे व एक ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर पसरविण्यात येणाºया अफवांवर विश्वास ठेवू नये, रमजान ईद भयमुक्त वातावरणात साजरी करावी.कॅम्पातील पोलीस कवायत मैदानावर रमजान ईदची मुख्य नमाज पठण केली जाणार आहे. तसेच इतर १२ ठिकाणी व प्रार्थनास्थळांमध्ये दुवा व नमाजपठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविल्या आहेत. पोलीस कवायत मैदानावरील टपºया, हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.