पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

By Admin | Updated: December 16, 2015 23:40 IST2015-12-16T23:39:42+5:302015-12-16T23:40:49+5:30

सटाणा : दहा कर्मचाऱ्यांची नव्याने नेमणूक

Increase in the number of police personnel | पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ

सटाणा : शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि चोऱ्यांमुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने मंगळवारी जिल्हा प्रभारी पोलीसप्रमुखांनी सटाणा पोलीस ठाण्यासाठी दहा पोलीस कर्मचाऱ्यांची नव्याने अतिरिक्त नेमणूक केली असल्याची माहिती मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
ब्रिटिश काळात सटाणा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आले. कालांतराने पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसंख्या वाढली आणि त्या प्रमाणात गुन्हेगारीदेखील. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारीवर मात करण्यात अपयश येत असल्याने साहजिकच पोलिसांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. दरम्यान, पोलीसप्रमुखांनी हा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून नव्याने अतिरिक्त दहा पोलीस कर्मचाऱ्यांची सटाणा पोलीस ठाण्यात नेमणूक केली. त्यात चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दहा पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यामुळे आता एकूण ६४ पोलीस कर्मचारी सटाणा ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान, चोऱ्या रोखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने शहरात युवा सुरक्षा दल स्थापन करण्याबरोबरच ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी रात्रीच्या गस्तीसाठी तैनात करण्यात येणार असल्याचे
पोलीस उपअधीक्षक नखाते यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Increase in the number of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.