उमराणेत लाल कांद्याच्या आवकेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:10 IST2019-12-20T14:08:37+5:302019-12-20T14:10:59+5:30
वाहनांची गर्दी : बाजार भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंंतीत उमराणे : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची आवक वाढली असुन गुरु वारच्या तुलनेत शुक्र वारी (दि.२०) बाजारभावात तब्बल तीन हजार रु पयांची घसरण झाली

उमराणेत लाल कांद्याच्या आवकेत वाढ
वाहनांची गर्दी : बाजार भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंंतीत
उमराणे : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची आवक वाढली असुन गुरु वारच्या तुलनेत शुक्र वारी (दि.२०) बाजारभावात तब्बल तीन हजार रु पयांची घसरण झाली आहे.एका दिवसातच मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चालु आठवड्यात लाल कांद्यांच्या दरात चढउतार सुरु असतानाच काल गुरु वारी लाल कांद्यानी पुन्हा दहा हजाराचा टप्पा ओलांडत 10 हजार ५०० रु पयांपर्यंत सर्वोच्च बाजारभाव होता. आजही तेच बाजारभाव राहतील असा अंदाज असतानाच कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने सकाळच्या सत्रात तब्बल तिन हजार रु पयांची घसरण होत कमीतकमी 2 हजार रु पये, जास्तीत जास्त ७ हजार ५०० रु पये तर सरासरी ५ हजार रु पयांपर्यंत बाजारभाव होते. एका दिवसातच तिन हजार रु पयांची घसरण झाल्याने शेतकर्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. बाजार आवारात सुमारे १६०० ते १७०० पिक अप व ट्रॅक्टर वाहने कांदा विक्र ीसाठी दाखल झाले होते. दरम्यान मागील आठवड्यापासुन उन्हाळी कांदा संपल्याने सद्यस्थितीत लाल कांद्यावरच मदार असुन परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामान व धुक्यामुळे लाल कांद्याचे उत्पादक कमालीचे घटले असताना शेतातील अंतिम टप्प्यातील शिल्लक असलेला कांदा बाजारात विक्र ीसाठी आल्याने कांदा आवक वाढली आहे.