आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:51 IST2021-04-17T18:49:27+5:302021-04-17T18:51:52+5:30
पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे.

आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवा
पिंपळगाव बसवंत : वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आजपर्यंत कोरोना काळात आशा स्वयंसेविकाच सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच विमा कवच देण्याची मागणी कारसूळ (ता. निफाड) येथील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केली आहे.
आशा कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या सर्वाधिक महिला गरिब कुटुंबातील आहे. कुठलीही तक्रार न करता त्या अखंडपणे सेवा देत आहेत. कोरोना काळात काम करताना अनेक आशा कार्यकर्त्या बाधितही होत आहेत. त्यावेळी त्यांच्या उपचाराच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने आशा कार्यकर्त्यांचे मानधन वाढवून देत त्यांना दिलासा द्यावी, असेही काजळे यांनी म्हटले आहे.