शवदाहीका वाढवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:23 IST2018-08-06T16:23:04+5:302018-08-06T16:23:32+5:30
जेष्ठ नागरीकांना या पायऱ्यावर बसण्यासाठी व चढ उतार करणे शक्य नसल्याने या पायीची उंची कमी करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

शवदाहीका वाढवाव्यात
चांदवड येथील स्मशानभुमीतील पायरीची उंची कमी करुन
चांदवड - येथील अमर धाम व स्मशानभुमीत दोनच शवदाहिका असून त्यात वाढ करावी तसेच नागरीकांना बसण्यासाठी शेड केले असून त्या शेडच्या पहिल्या पायरीची उंची सर्वात जास्त असल्याने जेष्ठ नागरीक व नागरीकांना बसण्यासाठी मोठी कसरत करावी लागते या साठी शवदाहिकाची संख्या वाढवून शेडमधील पायरीची उंची त्वरीत कमी करावी अशी मागणी चांदवड येथील जेष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष सोनूपंत ठाकरे यांनी एका पत्राद्वारे चांदवड नगरपरिषदेकडे केली आहे. जेष्ठ नागरीकांना या पायऱ्यावर बसण्यासाठी व चढ उतार करणे शक्य नसल्याने या पायीची उंची कमी करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.