सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:17 IST2021-01-25T19:26:39+5:302021-01-26T02:17:53+5:30
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांत वाढ
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.
सटाणा-मालेगाव रस्ता हा गुजरात राज्याला जोडणारा असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ अधिक असते. तसेच सटाणा कृषी मार्केटला शेतीमाल विक्रीसाठी जाणारे ट्रॅक्टर, मोटारसायकल, प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशी अनेक प्रकारची वाहने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. या रस्त्यावर सटाणा ते ब्राह्मणगावपर्यंत दीडशेहून अधिक खड्ड्यांची संख्या आहे.
एक खड्डा टाळत असताना वाहन दुसऱ्या खड्ड्यात केव्हा जाऊन पडेल व मागून येणारे वाहन पहिल्या वाहनावर केव्हा येऊन आदळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सदर दुरवस्था झालेल्या रस्त्यामुळे मागील आठवड्यात अनेक अपघात झाले. भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न वाहनधारकांकडून विचारला जात आहे. सदर खड्डे त्वरित बुजवण्याची कार्यवाही व्हावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे संतप्त वाहनधारकांत बोलले जात आहे.