भाऊ-बहिणींची नाशकात गैरसोय

By Admin | Updated: August 29, 2015 22:45 IST2015-08-29T22:44:12+5:302015-08-29T22:45:08+5:30

भाऊ-बहिणींची नाशकात गैरसोय

Inconvenience to brothers and sisters in Nashik | भाऊ-बहिणींची नाशकात गैरसोय

भाऊ-बहिणींची नाशकात गैरसोय


नाशिक : रक्षाबंधन हा सण कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी आल्यामुळे चारही बाजूने रस्ते बंद ठेवण्यात आले होते. यामुळे या सणाच्या आनंदावर विरजण पडले. नाशकात प्रत्येक ठिकाणी बांबू लावून रस्ते अडविण्यात आले होते. बघावे तिकडे पोलीसच पोलीस दिसत होते. शहरातील अन्य भागांतून पंचवटीत येण्यासाठी सोय नसल्यामुळे भाऊ बहिणींना एकमेकांच्या घरी जाणे अशक्य झाले होते. सकाळी पर्वणीनिमित्त पंचवटीतील काही रस्त्यांवर गर्दी होती. परंतु ज्या रस्त्यावर काहीच गर्दी नव्हती तिथेही रस्ते बंद ठेवण्यात आल्याने आल्या मार्गाने वाहनचालकांना परत फिरावे लागत होते. सामान्य नागरिक पोलिसांना विनवणी करताना अनेक ठिकाणी दिसत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Inconvenience to brothers and sisters in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.