शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

काळा पैसा रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:20 AM

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत.

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाल्याची माहिती नागपूर येथील आयकर विभागाचे प्रधान संचालक (चौकशी) जय राज काजला यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यातील विमानतळांवर नजर ठेवण्यासाठीही खास पथके तैनात करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नागपूर विभागांतर्गत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्टÑ (शिर्डी व नगर वगळता) या भागातील २४ लोकसभा मतदारसंघ येत असल्याची माहिती काजला यांनी दिली. यातील प्रत्येक विभागासाठी एक नोडल आॅफिसर नियुक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्टÑासाठी नाशिक आयकर विभागाचे सहसंचालक अमितकुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या हाताखाली १४ सबनोडल आॅफिसर आणि व्हेरिफिकेशन आॅफिसर असा ताफा राहणार आहे. ही पथके काळ्या पैशावर नजर ठेवणार असून, मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काजला यांनी सांगितले. काळ्या पैशाबाबत कोणाला आयकर विभागाला माहिती द्यावयाची असल्यास त्यांच्यासाठी १८०० २३३ ३७८५ हा टोल फ्री क्रमांक तसेच ९४०३३९१६६४ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही उपलब्ध असल्याचे काजला यांनी सांगितले. याशिवाय ०७१२-२५२५८४४ हा फॅक्सही वापरता येईल. माहिती देणाऱ्याची इच्छा असल्यास त्याचे नाव गुप्त राखले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.या काळामध्ये बॅँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बॅँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी नाशिक आयकर विभागाचे सहसंचालक अमितकुमार सिंग, सहायक संचालक अशोक मुराई, आयकर अधिकारी धनराज बोराडे आदी उपस्थित होते.अडीच कोटींची रोकड जप्तनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागात सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहितीही काजला यांनी यावेळी दिली. शुक्रवारी रामटेक मतदारसंघामध्ये ५० लाख रुपयांची रोकड जप्त झाली आहे, तर याआधी बीड मतदारसंघामध्ये १ कोटी ९० लाखांची रोकड जप्त केली गेली आहे. याबाबतची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.विमानतळांवरही पथके करणार तैनातविभागातील सर्व विमानतळांवरही आयकर विभागाची नजरराहणार असून, प्रत्येक विमानतळावर पथके तैनात केली जाणार आहेत. नागपूर, औरंगाबाद, गोंदिया, नांदेड, जळगाव आणि नाशिक ही विमानतळे रडारवर आहेत. ज्या विमानतळांवर नियमितपणे विमानांचे आगमन-निर्गमन होते तेथे तसेच अन्य ठिकाणीही विमाने तसेच हेलिकॉप्टरने येणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांचीही तपासणी होऊ शकते.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयElectionनिवडणूकblack moneyब्लॅक मनी