शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाचा वापर रोखण्यास आयकर विभाग सज्ज : काजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:45 IST

विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला असून, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पथकाची नियुक्ती करून काळा पैसा रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती नागपूरचे मुख्य आयकर संचालक (शोध) जयराज काजला यांनी पत्रकारांना दिली.विधानसभा निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये जलद कृती पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे काजला यांनी सांगितले. याशिवाय या भागातील नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव या चार विमानतळांवर हवाई सूचना पथके २४ तास तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काळ्या पैशासंदर्भातील तक्रारी करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी नागपूर येथे २४ तास सुरू राहणारा एक कक्ष सुरू केल्याची माहिती काजला यांनी दिली. या कक्षाचा १८०० २३३ ३७८५ हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ९४०३३९१६६४ या क्रमांकावर अथवा ०७१२-२५२५८४४ या फॅक्स क्रमांकावरही माहिती कळविता येऊ शकेल, असे काजला म्हणाले. यावेळी नाशिकचे अतिरिक्त आयकर संचालक (शोध) अमितकुमार सिंह, सहायक आयकर संचालक अशोक मुराई व संदीप जुमले, आयकर अधिकारी धनराज बोराडे हे उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाचा प्रमुख म्हणून एक सबनोडल आॅफिसर असेल. याशिवाय दोन आयकर अधिकारी आणि तीन निरीक्षक असतील. हे पथक जिल्ह्यात दिवस-रात्र लक्ष ठेवून असेल. आलेल्या तक्रारींची या पथकामार्फत छाननी केली जाईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयNashikनाशिक