शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे उत्पन्न लॉक ; महावितरणचा मात्र ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:16 IST

टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरांमध्ये  दिसून येत आहे. 

ठळक मुद्देमहावितरणचा ग्राहकांना शॉक दहा हजार ते लाख रुपयांपर्यंत वीजबील देण्याचा प्रकार सरासरी वीज बीलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वीजबील

नाशिक : कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने आणि उद्योग धंदेही प्रभावित झाल्याने नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले आहे. मात्र अशा स्थितीतही महावितरणकडून ग्राहकांना अंदाजे वीजबील आकारणी करून वाढीव बिलांचा शॉक देत असल्याचे प्रकार नाशिक शहरातील सिडकोसह विविध उपनगरांमध्ये  दिसून येत आहे. महावितरणकडून लॉकडाऊनच्या काळात वीज मिटर रिडींग न घेता ग्राहकांना अंदाजे सरासरी वीजबिल दिल्यामुळे सिडकोतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यातील काही नागरिकांना चक्क दहा हजार तर काही नागरिकांना लाख रुपयांपर्यंतचे बिल देण्यात आल्याने महावितरणच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या  २२  मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या काळात महावितरणकडून कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मीटर रीडिंग घेण्याचे काम बंद करून सरासरी वीजबील आकारणी करण्याचे धोरण आजमावले होते. त्यामुळे नागरिकांना दरमहिन्याप्रमाणे वीज बील येईल अशी अपेक्षा होती. मात्र महावितरणकडून मिळालेले वीजबील पाहिल्यानंतर ग्राहकांना धक्काच बसला आहे. महावितरणने सर्व ग्राहकांना सरासरी अंदाजे बिल दिल्याचे सांगितले जात असले तरी बहुतांशी नागरिकांना यापूर्वी येणाऱ्या वीजबिलापेक्षा लॉकाडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा बील मिळाल्याने नागरिकांधमधून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोनशे रुपयांपर्यंत बीजबील येणाºया नागरिकांना आता हजाराहून अधिक तर काही नागरिकांना चक्क लाख रुपयांपर्यंत वीजबील देण्याचा प्रताप महावितरणच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आधिच लॉकडॉऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना महावितरणने अव्वाच्या सव्वा वीजबील आकारून एक प्रकारे नागरिकांचे उत्पन्न लॉक झाले असताना महावितरण त्यांना वाढीव वीजबीलांचा शॉक देत असल्याची भावना नागरिकांध्ये निर्माण झाली आहे. 

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकconsumerग्राहकbillबिल