इनरव्हील क्लब मिडटाऊन नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:59 IST2019-07-11T16:58:36+5:302019-07-11T16:59:13+5:30
अध्यक्षपदी उर्वशी कासारे : सचिवपदी शितल भावसार

इनरव्हील क्लब मिडटाऊन नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
नाशिक : जिल्हा ३०३ अंतर्गत इनरव्हील क्लब आॅफ नाशिक मिडटाऊनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी डॉ. उर्वशी कासारे निकम यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. मनिषा जगताप यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
हॉटेल नाशिककर येथे झालेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनिता पगारे व स्वरांजली पिंगळे उपस्थित होत्या. यावेळी, सौ. शितल भावसार यांची सचिवपदी नियुक्ती झाली. त्यांनी श्वेता नारंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच कोषाध्यक्ष निलम आव्हाड, आयएसओ सौ. प्रतिभा गोवर्धने, क्लब को-आॅर्डिनेटर छाया पाटील यांनीही पदभार स्वीकारला. यावेळी मावळत्या अध्यक्ष डॉ. मनिषा जगताप यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष डॉ. उर्वशी कासारे निकम यांनी इनरव्हील क्लबची माहिती देत आगामी संकल्प मांडले. स्वरांजली पिंगळे यांनी साक्षर व सक्षम कसे व्हावे याविषयावर मार्गदर्शन केले तर अनिता पगारे यांनी महिलांच्या धाडसाबद्दल व त्यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. चारुशिला खैरनार, प्रतिभा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब आॅफ नाशिक मिडटाऊनचे पदाधिकारी तसेच नाशिकमधील इतर इनरव्हीलचे पदाधिकारी यांचेसह सरीता नारंग, मिनल जयस्वाल, सुनीता उबाळे, विधी भगत आदी उपस्थित होते.