आडगाव उड्डाणपुलाजवळील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 8, 2014 00:45 IST2014-12-08T00:44:36+5:302014-12-08T00:45:56+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळगावचा तरुण ठार

आडगाव उड्डाणपुलाजवळील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक : आडगाव उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पिंपळगाव बसवंत येथील कुंदन सोनवणे या वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील भिडे नगरमध्ये राहणारा कुंदन अशोक सोनवणे हा रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिकहून पिंपळगावला दुचाकीने जात होता़ त्यास आडगाव उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचे डोके व हातास जबर मार लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र सोनवणे यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)