कळमदरे येथे जलशुद्धीकरण युनिटचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:53 IST2020-06-22T22:21:40+5:302020-06-22T22:53:44+5:30
चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

कळमदरे येथे जलशुद्धीकरण युनिटच्या उद्घाटनप्रसंगी ह.भ.प. रमेश गांगुर्डे, सरपंच डॉ. बाळासाहेब वानखेडे, सुखदेव जाधव, कैलास बच्छाव, कुसुमबाई गांगुर्डे, गंगूबाई वानखेडे व नागरिक.
ठळक मुद्दे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही संकल्पना
चांदवड : तालुक्यातील कळमदरे ग्रामपंचायतीस १४व्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बसविण्यात आले. त्याचे उद्घाटन ह.भ.प. रमेश दत्तू गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कळमदरेचे नूतन सरपंच डॉ. बाळासाहेब वानखेडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमदरे गावात चांगली सुविधा व्हावी नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
यावेळी सुखदेव रामचंद्र जाधव, कैलास कारभारी बच्छाव, कुसुमबाई विठोबा गांगुर्डे, गंगूबाई शिवराम वानखेडे, सागर काशीनाथ जाधव व कळमदरे येथील नागरिकांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचेदेखील पालन करून कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.