विविध विकासकामांचे उद्घाटन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST2021-07-17T04:12:53+5:302021-07-17T04:12:53+5:30

घोटी : तालुक्यातील भावली, तांबड माळ आदी भागांत अंगणवाडी नवीन इमारत व भावली येथे स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण, पेव्हर ...

Inauguration of various development works - A | विविध विकासकामांचे उद्घाटन - A

विविध विकासकामांचे उद्घाटन - A

घोटी : तालुक्यातील भावली, तांबड माळ आदी भागांत अंगणवाडी नवीन इमारत व भावली येथे स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, हायमास्टच्या झालेल्या नवीन कामांचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना संपर्क अभियानाची प्रथम सुरुवात भावली येथून करण्यात आली. नांदगावसदो गटाचे जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे उपस्थित होते. दोन दिवसांच्या या अभियानात जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा व शिवसैनिकांच्या विविध समस्या जाणून घेत गावपातळीचा व दुर्गम भागाचा विकास साधणार आहे. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, भगवान आडोळे, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, माजी आमदार निर्मला गावीत, गटप्रमुख दौलत बोंडे, टिटोलीचे उपसरपंच अनिल भोपे उपस्थित होते.

-----------------

विकासकामांचे उद्घाटन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, निवृत्ती जाधव, निर्मला गावित यांच्यासह पदाधिकारी. (१५ घोटी)

150721\592415nsk_14_15072021_13.jpg

१५ घोटी

Web Title: Inauguration of various development works - A