सटाणा इनरव्हील क्लबचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:20+5:302021-07-19T04:11:20+5:30

कार्यक्रमासाठी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, रोटरी उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, तसेच नगराध्यक्ष सुनील मोरे ...

Inauguration of the Santana Inner Wheel Club | सटाणा इनरव्हील क्लबचे पदग्रहण

सटाणा इनरव्हील क्लबचे पदग्रहण

कार्यक्रमासाठी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, रोटरी उपप्रांतपाल दिलीप ठाकरे, तसेच नगराध्यक्ष सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा रूपाली जाधव यांनी मागील वर्षाच्या क्लबच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. कोरोनासारख्या महाभयंकर कालावधीतही इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउनने प्रोजेक्टचा अमृत महोत्सव साजरा करून, खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांनी क्लबच्या कार्याचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी यांनी क्लबच्या भावी वाटचालीस ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. साधना पाटील यांनी अध्यक्षपदाची, तसेच रेखा वाघ यांनी सचिवपदाची सूत्रे ताब्यात घेतली, रोटरी अध्यक्ष ॲड.अभिमन्यू पाटील, तसेच यशवंत अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्ष विद्या अमृतकर यांनी केले, तर सूत्रसंचलन तुषार महाजन यांनी केले. सेक्रेटरी प्रकाश सोनग्रा यांनी आभार मानले. कार्यक्रमात रोटरी क्लब अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या उपाध्यक्ष नयना कोठावदे, कोषाध्यक्ष सुजाता पाठक, मीनाक्षी जाधव, कविता जाधव, सीसीसीसी म्हणून कल्पना जाधव यांना पिन प्रदान करण्यात आली. यावेळी चार्टर प्रेसिडेंट रूपाली कोठावदे, माजी अध्यक्ष स्मिता येवला, संगीता खैरनार, नेहा जगताप, रंजिता मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

फोटो- १८ सटाणा इनरव्हील

180721\18nsk_20_18072021_13.jpg

फोटो- १८ सटाणा इनरव्हील 

Web Title: Inauguration of the Santana Inner Wheel Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.