‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:09 IST2020-10-04T19:08:58+5:302020-10-04T19:09:27+5:30
सर्वतीर्थ टाकेद : माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो नाशिक यांच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावात मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांनी कोरोनाविषयी जनजागृती कार्यक्रम सादर केला.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन
सर्वतीर्थ टाकेद : माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो नाशिक यांच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील वाघेरे गावात मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांनी कोरोनाविषयी जनजागृती कार्यक्रम सादर केला.
मोहिमेचे उद्घाटन भगूरच्या नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते झाले. कोरोना जनजागृती कालापथकाने सादर केलेल्या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भगूर पालिकेचे उपनगराध्यक्ष सुदेश वालझाडे, शंकर करंजकर, नितीन करंजकर आदी उपस्थित होते.
शाहीर गायकर यांच्या कलापथकात प्रशांत भिसे, नामदेव गणाचार्य, दुर्गेश गायकर, पंढरीनाथ भिसे, रामकृष्ण मांडे, शिवाजी गायकर, शंकरराव दाभाडे या कलावंतांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, एस.बी. मालखेडकर, सी. के. चांदुके यांनी प्रयत्न केले.
वाघेरे येथे आरोग्य मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी अनिता करंजकर, विजय करंजकर ,उत्तमराव गायकर आदी. (०४ टाकेद१)