शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कामगार शक्ती ग्राहक भांडारचे उद्घाटन

By admin | Updated: October 26, 2016 23:19 IST

कामगार शक्ती ग्राहक भांडारचे उद्घाटन

सिन्नर : येथील संजीवनी नगरमधील महादेव कॉलनीत कामगार शक्ती फाऊंडेशन संचलित कामगार शक्ती सहकारी ग्राहक भांडारचे उद्घाटन करण्यात आले. कामगार शक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल सरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अ‍ॅडव्हान्स एन्झाईम कारखान्याचे संचालक किशोर राठी व ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते ग्राहक भांडारचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कामगार शक्ती फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बी. एन. नाकोड, माजी सैनिक सुरेंद्रपाल धांड, मारुती दिघोळे, बाबूलाल शेलार, हाडवैद्य विठ्ठल वाघ, सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते, हौशी मूर्तीकार संजय क्षत्रिय यांचा सत्कार करण्यात आला. सिन्नरच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सहकारातून समृध्दीकडे नेण्याची संकल्पना प्रत्यक्षात राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्योजक राठी यांनी यावेळी केले. सहकाराचा कारभार योग्य रितीने केल्यास त्याची वृध्दी होण्यास वेळ लागत नाही, त्यासाठी संयमाची गरज असल्याचे मत संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक विलास कवडे यांनी व्यक्त केले. कामगारांच्याच भांडवलातून ग्राहक भांडार उभारण्यात आल्याचे कामगार शक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरवार यांनी सांगितले. रवींद्र गिरी यांनी आभार मानले. याप्रसंगी कामगार शक्ती फाऊंडेशनचे नवनाथ सोबले, नितीन नाईकवाडी, किरण भोसले, कोमल धांड, पांडू वैद्य, बाबूराव धुळे, बाळासाहेब घोटेकर, संतोष नवले, किरण आहेर, मगन साळवे, विश्वजित निकम, माणिक नवले, सुरेश जोंधळे, गृहउद्योगाच्या सुषमा नाईकवाडी, प्रमिला सरवार, स्वाती गिरी, जयश्री भोसले, सुनीता सोबले, स्मिता  कदम, दिपाली चिंतामणी, आरती जोंधळे, शैला पानगव्हाणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)