नाशिकरोड येथे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:44 IST2020-02-21T00:44:18+5:302020-02-21T00:44:45+5:30
माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

शिवजयंतीनिमित्त माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉटवर्क व अनोखे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना छायाचित्रकार प्रसाद पवार. समवेत सुनील शिरसाठ, रामभाऊ जगताप, अशोक गायधनी, प्रकाश पगारे, अभिजित आहेर, श्याम खोले, प्रणिता दुसाने, सी.एम. ईरामणी, के.पी. खांडेकर, नामदेव गायधनी आदी.
नाशिकरोड : माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
शिखरेवाडी पासपोर्ट कार्यालयाशेजारील पु. ना. गाडगीळ कलादालनात प्रसिध्द छायाचित्रकार प्रसाद पवार यांचे हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस स्टाफ युनियनचे सुनील शिरसाठ, मजदूर संघाचे माजी सरचिटणीस रामभाऊ जगताप, माजी कार्याध्यक्ष अशोक गायधनी, प्रकाश पगारे, अभिजित आहेर, श्याम खोले, पी. एन. गाडगीळ सन्सच्या व्यवस्थापिका प्रणिता दुसाने, सी.एम. ईरामणी आदी मान्यवर उपस्थित होते.
इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कला विभागातील सेवानिवृत्त चित्रकार सुरेश सोनवणे ऊर्फ रिचर्ड यांनी केवळ आपला छंदा जोपासत आदिवासी महिला, निसर्गदुश्ये, पक्षी, शिल्प, पोट्रेट, स्मरण चित्रे, नदीकाठ, अलंकारभूषित महिला आदी चित्रे त्यांनी रेखाटलेली आहेत. ही चित्रे साकारताना पोस्टररंग, जलरंग, प्युजी कलर, आॅइल कलर यांचा समावेश आहे. तसेच सीडीचा प्रकाश चमकल्यानंतर पडणाऱ्या प्रकाशित रंगाने त्यांनी चित्रे रेखाटली आहेत. सदर चित्रप्रदर्शन हे २८फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे.
सुत्रसंचलन भगवान लोळगे यांनी केले. यावेळी के. पी. खांडेकर, नामदेव गायधनी, सिद्धार्थ पवार, दिपक बर्वे, राजु पवार, सुरेश बोराडे, भाऊसाहेब लोंढे, नाना शेळके, शेखर वाईकर, गोखुळ काकड, मोहन रावळे, बाळासाहेब चंद्रमोरे, देवा उदावंत, संजय देशमुख आदि उपस्थित होते.