देवपूर शाळेत ई-लर्निंगचे उद्घाटन
By Admin | Updated: September 26, 2016 00:08 IST2016-09-26T00:08:18+5:302016-09-26T00:08:52+5:30
देवपूर शाळेत ई-लर्निंगचे उद्घाटन

देवपूर शाळेत ई-लर्निंगचे उद्घाटन
डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील चाफ्याचे पाडे (देवपूर) येथे लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंग, डिजिटल वर्ग तसेच संगणक रूमचे पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चाफ्याचा पाडा (देवपूर) येथील शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, शिक्षण विस्ताराधिकारी प्रशांत जाधव, विस्ताराधिकारी परशराम नेरकर, सरपंच काळीबाई बागुल, मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे, मुरलीधर मुसळे उपस्थित होते. यावेळी चाफ्याचे पाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील ई-लर्निंग व डिजिटल वर्ग तसेच संगणक रूम सारखी सुविधा येथील उर्वरित दोन शाळांमध्येही उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी केली. बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वच्छता करावी तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. शिक्षण विस्ताराधिकारी प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखालील डांगसौंदाणे केंद्र शैक्षणिक गुणवत्तावाढीस तालुक्यात पहिल्या क्रमांकावर असून, त्यांचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे बहिरम यांनी सांगत जाधव यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी हिरामण जगताप, शांताराम बागुल, वसंत बागुल, आनंदा जगताप, मुख्याध्यापक कुंदन चव्हाण, चिंतामण सूर्यवंशी, सतीश मोरे, विलास देवरे, धर्मेंद्र बागुल, जयवंत महाले, दिलीप बिरारी, कैलास गांगुर्डेे, बापू देवरे, योगीता देवरे, अभिमन गुंजाळ, राहुल भामरे उपस्थित होते. सूत्रसंचालन केंद्र मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले. आभार कैलास गांगुर्डे यांनी मानले. (वार्ताहर)
९ शाळा ई-लर्निंग लोकसहभागातून जवळपास २ लाख रु पये निधी जमा करु न ४ संगणक संच, प्रोजेक्टर व डिजिटल वर्ग तयार करु न घेतला. डांगसौंदाणे केंद्रातील ११ पैकी ९ शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली. ही गौरवास्पद बाब आहे.