रोटरी क्लब आॅफ कळवणचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:13 IST2020-07-10T20:59:15+5:302020-07-11T00:13:08+5:30
कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवण आणि रोटर अॅक्ट क्लब आॅफ कळवण यांचा पदग्रहण सोहळा शारीरिक अंतर राखत पार पडला. व्हिडिओ कॉँफरन्सच्या माध्यमातून सिंगापूर-मलेशिया येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३३१०चे प्रांतपाल राजामोहन मुन्नीसामी, डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल शब्बीर शाकीर, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, डिस्ट्रिक्ट सेक्रे टरी टॉबी भग्वागर, राजीव शर्मा उपस्थित होते.

रोटरी क्लब आॅफ कळवणचा पदग्रहण सोहळा
कळवण : रोटरी क्लब आॅफ कळवण आणि रोटर अॅक्ट क्लब आॅफ कळवण यांचा पदग्रहण सोहळा शारीरिक अंतर राखत पार पडला.
व्हिडिओ कॉँफरन्सच्या माध्यमातून सिंगापूर-मलेशिया येथील रोटरी डिस्ट्रिक्ट ३३१०चे प्रांतपाल राजामोहन मुन्नीसामी, डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल
शब्बीर शाकीर, माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे, डिस्ट्रिक्ट सेक्रे टरी टॉबी भग्वागर, राजीव शर्मा उपस्थित होते.
उपप्रांतपाल शांताराम गुंजाळ व जितेंद्र कापडणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब आॅफ कळवणचे नूतन अध्यक्ष राजेश मुसळे यांनी मावळते अध्यक्ष रवींद्र पगार यांच्याकडून पदभार स्वीकारला. सेक्र ेटरी पदाचा पदभार नीलेश भामरे यांनी स्वीकारला. रोटर अॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदाचा पदभार प्रणाली शिरोरे, तर सेक्रेटरी पदाचा पदभार नयना कापडणे यांनी स्वीकारला. रोटरी कळवणने नव्याने आरसीसी क्लब पाटविहीर सुरू केला असून, त्याचा पदभार प्रकाश भोये यांनी स्वीकारलो. याप्रसंगी चंदन कापडणे, हेमंत सोनवणे,भास्कर भामरे, सुवर्णा पगार या नूतन सदस्यांना रोटरी पिन प्रदान करण्यात आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवणमधील कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
गालीब मिर्झा, निंबा पगार, विकेश बागुल, अवि पगार, मोहनलाल संचेती, गंगाधर गुंजाळ, सुभाष जैन, बापू कुमावत, संभाजी पवार, इनरव्हीलच्या
अध्यक्ष स्नेहा मालपुरे, नयना पगार, निर्मला संचेती, रोहिणी कापडणे, जयश्री शिरोरे आदी उपस्थित होते. विलास शिरोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर नीलेश भामरे यांनी आभार मानले.