शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘शेल्टर’चे दिमाखदार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:51 IST

गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना प्लॅट्स, प्लॉट््स, आॅफिसेस, फॉर्महाउस, शॉप यांसह बांधकाम साहित्य, गृहसजावट आणि अर्थसहाय्याचे अनेकविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाºया शेल्टर प्रदर्शनाचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे गुुरुवारी (दि.१९) दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले.

ठळक मुद्देप्रॉपर्टी एक्स्पो : एकाच छताखाली गृहप्रकल्पांचे विविध पर्याय

नाशिक : गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना प्लॅट्स, प्लॉट््स, आॅफिसेस, फॉर्महाउस, शॉप यांसह बांधकाम साहित्य, गृहसजावट आणि अर्थसहाय्याचे अनेकविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणाºया शेल्टर प्रदर्शनाचे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे गुुरुवारी (दि.१९) दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. नाशिक शहरात घर घेऊ इच्छिणाºया संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह व मुंबई, पुण्यातील ग्राहकांना त्यांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दि.१९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘शेल्टर-२०१९’ एक पर्वणी ठरणार आहे.डोंगरे वसतिगृह मैदानावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत सुमारे दहा एकरावरील विस्तिर्ण प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने क्रेडाईतर्फे आयोजित या ‘शेल्टर-२०१९’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, उपाध्यक्ष तथा शेल्टरचे समन्वयक रवि महाजन, सहसमन्वयक कृणाल पाटील, क्रेडाईचे माजी, जितूभाई ठक्कर, अध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्रचे मानद सचिव सुनील कोतवाल, निखिल रुंग्टा आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजाराम माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नाशिक शहरातील स्वच्छ व हरित शहर अशी ओळख कायम ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकाम प्रकल्प साकारण्याचा सल्ला दिला. नाशिक हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून, येथील निवासासाठी पोषक वातावरणासह नियोजनपूर्वक झालेला औद्योगिक व रस्ते विकास शहराच्या भविष्यातील विकासाला चालना देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिक शहराच्यादृष्टीने भविष्यातील आव्हानांचा विचार करून बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या प्रकल्पांचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना शहर विकासासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही वेगवेगळ्या व्यावसायिक संघटनांनी सहभाग नोंदविण्याची गरज माने यांनी यावेळी व्यक्त केली. बांधकाम प्रकल्पांचे नियोजन व आखणी करतानाच त्यात सौरऊर्जाप्रकल्प, जलसंवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना करून प्रकल्प उभारण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले, तर प्रास्ताविक करताना क्रे डाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी शहराच्या विकासात क्रेडाईचे योगदान नमूद केले. नाशिकमध्येच जन्मलेल्या क्रेडाईने नाशिक शहर आणि शेल्टरला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विशेष उंची मिळवून दिल्याचे अधोरेखित करतानाच ‘शेल्टर-२०१९’ प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यातून शहराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. तर सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले.एकाच छताखाली विविध स्टॉलउत्तम हवामान, नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या अनेक संधी यामुळे नाशिकबाहेरील अनेक नागरिकांची नाशिकमध्ये घर घेण्याची तसेच गुंतवणूक करण्याची इच्छा असते, त्यांनाही वेगवेगळे पर्याय एकाच छताखाली शेल्टर प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात सुमारे शंभर विकासकांसह १५ वेगवेगळ्या अर्थसहायक करणाºया कंपन्या, ५५ बांधकाम साहित्य पुरवठादार कंपन्यांच्या व वितरकांच्या स्टॉलचा समावेश आहे. ‘वॉव नाशिक, नाऊ नाशिक’ या संकल्पनेवर आधारित शेल्टर-२०१९ या प्रदर्शनात ‘भविष्यातील नाशिक कसे असेल’ याकरिता एक वेगळी गॅलरी तयार करण्यात आली आहे.पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक फ्लॅट््सची विक्री‘शेल्टर-२०१९’ प्रॉपर्टी एक्स्पोला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच शंभरहून अधिक फ्लॅट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शेल्टरला चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी (दि.२०) रोजी ‘धुराळा’ चित्रपटातील कलाकार अलका कुबल, सई ताह्मणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव व अंकुश चौधरी हे प्रदर्शनास भेट देऊन नाशिककरांशी ‘शेल्टर’च्या व्यासपीठावरून संवाद साधणार असल्याने नाशिककर मोठ्या प्रमाणात शेल्टरला भेट देतील, अशी बांधकाम व्यावसायिकांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbusinessव्यवसाय