शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:12 IST

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे.

सायखेडा : काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या अनास्थेमुळे भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक हे नगदी पीक म्हणून शेतकरी आपल्या शेतात करतात, कमी कालावधीत चार पैसे हातात पडतील या आशेने ऐन उन्हाळ्यात भाजीपाला चांगल्या भावात विकला जाईल या आशेवर असलेल्या शेतक ºयाची गडगडणाºया भावामुळे मोठे नुकसान होत आहे. गोदाकाठ भागात अनेक शेतकºयांनी शेतात भाजीपाला पिकवला असून, आज भाव मिळत नसल्याने शेतात सोडून द्यावा लागत आहे. एका हंगामात दर नाही मिळाला तर दुसºया हंगामात तो भरून निघेल या आशेने शेतात केलेला भाजीपाला काढणीसाठी परवड नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला म्हणून गोदाकाठची ओळख झाली आहे. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी यामुळे उन्हाळ्यातदेखील शेतात पीक चांगले येते, शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पीक करत नाही. भाजीपाल्याचा तुटवडा येऊन बाजारभाव चांगला मिळेल या आशेवर शेतकरी रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करत असतात. भाव कमी मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला मार्केट अथवा आठवडे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे बंद केले आहे. भाजीपाला काढणे आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे हा खर्च वसूल होत नसल्याने शेतीतून भाजीपाला काढणे शेतकºयांनी बंद केले आहेशेतीची मशागत, रोपे, खते, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, मजुरी, असे लाखो रुपये भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमालाला निर्धारित मूल्य असल्यास शेती तोट्यात जाणार नाही शेतमालातून किमान शेतकºयाला प्रपंच चालविण्यासाठी चार पैसे मिळाले पाहिजे, झालेला खर्च किमान वसूल झाला पाहिजे, असे हमीभाव असले पाहिजे तरच शेतकरी वाचेल अन्यथा वाढते कर्ज, व्याज, मुलांचे शिक्षण, लग्न या सर्व गरजा शेतकरी कशा पद्धतीने पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.हमीभावाकडे दुर्लक्षशेतमाल परवडत नाही त्यामुळे हमीभाव मिळाला पाहिजे, अशी केवळ चर्चाच ऐकायला मिळते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयत्न करण्यासाठी कोणीही फारसा इच्छुक दिसत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. कोणीच या संदर्भात सरकारला धारेवर धरत नाही. केवळ शेतकरी संघटनेच्या अजेंट्याचा विषय असल्याने हमीभावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींची उदासीनता पहायला मिळते.प्रचंड मेहनत करून भाजीपाला पिकवला, कर्ज काढून, उसनवारी करून भांडवल खर्च केले. आज फ्लॉवर आणि कोबीला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले तर कोणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे, अशा काळात आम्ही शेतकºयांनी प्रपंच कसा चालवायचा, कुटुंब चालविण्यासाठी खर्च येतो तो कसा भागवायचा, शेतकरी आर्थिक परिस्थिती खचला जात आहे आता सरकारने आम्ही कसे जगावे याचा सल्ला घ्यावा ही विनंती आहे.- शांताराम हांडगे, शेतकरी, चाटोरी

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या