शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
4
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
5
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
6
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
7
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
8
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
9
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
10
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
11
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
12
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
13
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
14
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
15
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
16
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
17
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
18
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
19
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
20
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान

दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

By संजय पाठक | Published: August 15, 2022 11:34 AM

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

नाशिक - राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कोणी नाराज असेल तर पुढील मंत्री मंडळाच्या विस्तारात नाराजी दूर होऊ शकेल असेही त्यांनी सांगितलं तसेच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हे येत्या दोन तीन दिवसात जाहीर होईल असेही त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकांरांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपा संदर्भातील नाराजीबाबत शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी काही मत व्यक्त केलं होतं नंतर मात्र त्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिलं आहे असेही महाजन म्हणाले.

राज्य शासनात काम करण्यासाठी कोणतेही खाते  दुय्यम नाही. त्यामुळे भाजपाने चांगले खाते आपल्या मंत्र्यांना दिली. आणि अन्य सहकाऱ्यांना दुय्यम खाते दिले असे म्हणणे चुकीचे आहे असे  महाजन म्हणाले. आपल्याला वैद्यकीय शिक्षण खाते मिळाले आहे. त्यातही चांगले काम करता येईल. कोणाची काही नाराजी असेल तर पुढील मंत्रिमंडळ विस्तारात ती दूर होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार