वर्गखोल्यांच्या दुरुस्तीमुळे घोटेवाडी प्राथमिक शाळेचे रुप बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:51 PM2018-10-20T17:51:01+5:302018-10-20T17:51:25+5:30

सिन्नर : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्ती अनुदानातून करण्यात आली आहे.

With the improvement of classrooms, the forms of Ghotevadi Primary School were changed | वर्गखोल्यांच्या दुरुस्तीमुळे घोटेवाडी प्राथमिक शाळेचे रुप बदलले

वर्गखोल्यांच्या दुरुस्तीमुळे घोटेवाडी प्राथमिक शाळेचे रुप बदलले

Next

ेसिन्नर : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्ती अनुदानातून करण्यात आली आहे. या नूतनीकृत वर्गखोल्यांची जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांनी नुकतीच पाहणी केली.
दुष्काळी भागातील या शाळेच्या विकासात लोकसहभाग देखील मिळत असून लवकरच या शाळेचा चेहरामोहरा बदललेला असेल असे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी सांगितले. आपली शाळा समजून ग्रामस्थ जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी पुढे येवून मदत करतील तो क्षण खºया अर्थाने शिक्षकांच्या श्रमाचे चीज करणारा असेल याकडे केदार यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागात सुविधांची कमतरता असताना देखील उपक्रम शिक्षकांमुळे अनेक शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची बरोबरी केली आहे. यात घोटेवाडी येथील शाळेचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे केदार म्हणाले. घोटेवाडी शाळेच्या विकासात योगदान म्हणून त्यांनी सांस्कृतिक मंचासाठी छत बांधून देण्याचे आश्वासन केदार यांनी दिले.
गावातील शासकीय सेवक, अधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी कर्तव्य भावनेतून काम केले तर तालुक्यातील सर्वच सरकारी शाळांचा गुणवत्तात्मक दर्जा सुधारण्यास मदत होईल असे शिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांनी सांगितले. केदार यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद निधीतून मिळालेल्या अडीच लाखांच्या निधीतून वर्गखोल्या दुरूस्त करण्यात आल्या. या कामावर पाणी मारण्याचे काम करणाºया सुनील बच्छाव याने या कामाचे मानधन शाळेतील विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी दिले. तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित पुस्तक प्रदर्शन भेटीत मुलांना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम पालक जितेंद्र घोटेकर यांनी शाळेसाठी दिली.
विस्तार अधिकारी दिलीप पवार, मुख्याध्यापक संतोष झावरे, पोपट नागरगोजे, सोनाली शिंदे, सुरेखा शेळके, युवराज राऊत, संदीप लेंडे, उमेश खेडकर, प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्ते किशोर खामकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत ढमाले, उपसरपंच अमोल घोटेकर, पोलीस पाटील आवडीराम लोखंडे, भाऊराव वैराळ, दिलीप घोटेकर, अंकल घेगडमल, रवी आहेर, सुकदेव घेगडमल, लक्ष्मण घोटेकर, किसन तांबे, सागर घोटेकर, भिमराज कांदळकर, सुरेश घेगडमल, माधुरी घोटेकर, मनिषा पठाडे, प्रविश शेळके, नीलेश आव्हाड, किरण आव्हाड यांच्यासह पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title: With the improvement of classrooms, the forms of Ghotevadi Primary School were changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा