दोन मिठाई दुकानांवर छापे
By Admin | Updated: November 9, 2015 23:12 IST2015-11-09T23:11:27+5:302015-11-09T23:12:30+5:30
दोन मिठाई दुकानांवर छापे

दोन मिठाई दुकानांवर छापे
नाशिक : मनसेच्या तक्रारीनंतर अन्न व औषध विभागाच्या पथकाने पंचवटीतील दोन दुकांनावर छापे घातले, परंतु या ठिकाणी विनापरवाना भट्ट्या सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
दिंडोरी रोड आणि मखमलाबाद रोड येथील दोन मिठाईच्या दुकानांत निकृष्ट मिठाई आणि खराब खव्याचा वापर केला असल्याची तक्रार अन्न निरीक्षक उमेश कुंभोजकर आणि भरत इंगळे यांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली. मात्र, याठिकाणी अग्निशमनदलाच्या परवानगीशिवाय भट्ट्या चालविल्या जात असल्याची माहिती मिळाली. मनपा आयुक्तांना याबाबत अवगत येऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे मनसेचे संदीप भंवर, मनोज घोडके यांंनी दिली. यावेळी ललित ओहोळ, सौरभ सोनवणे आदि उपस्थित होते.