शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर, सातपूरमधील जुगार अड्डयांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:53 IST

नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

ठळक मुद्देजुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी

नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़

पाथर्डी फाट्यावरील नर्सरीच्या पत्र्याच्या शेडजवळ जुगार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी (दि़८) रात्री छापा टाकला असता संशयित फिरोज शाबीराबी शेख, विकास जगन्नाथ पराते व त्यांचा एक साथीदार हे कल्याण मटका जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुसरा छापा सातपूर पोलिसांनी औद्योगिक वसाहतीतील महिंद्र मटेरियल गेट समोरील सप्तशृंगी हॉटेल मागे शनिवारी (दि़८) सायंकाळी टाकला़ याठिकाणी संशयित नितीन जाधव व त्याचे दोन साथीदार पत्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कुरापत काढून एकास जबर मारहाणनाशिक - मागील भांडणाची कुरापत काढून सिडकोतील उत्तमनगरमधील रहिवासी जयेश बिरारी यास चार संशयितांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़८) दुपारी तोरणानगर शाळेजवळ घडली़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी वैभव मुठेकर, गौरव पाटइल, विशाल देशमुख (रा़पवननगर) व शुभम पेंढारे (तोरणानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़पाथर्डी फाटा परिसरातून दुचाकीची चोरीनाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगरमधील रहिवासी शिवाजी पाटील (रा.गणजय अपा.) यांची ६० हजार रुपये किमतीची यामाहा (एमएच १५ एफआर २५६०) दुचाकी चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अंबड औद्योगिक वसाहतीतून दुचाकी लंपासनाशिक : सिडकोतील स्वामी विवेकानंद नगरमधील रहिवासी देवराम दुसामेने यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ ओजी २८००) चोरट्यांनी अंबड औद्योगीक वसाहतीतील आकांशा पॉवर कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अल्पवयीन मुलीचे अपहरणनाशिक : विनयनगरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़७)सायंकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस