विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे
By Admin | Updated: May 23, 2017 21:40 IST2017-05-23T21:40:09+5:302017-05-23T21:40:09+5:30
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार वैज्ञानिक इशरा देणारे चित्र नसणाऱ्या विदेशी सिगारेट विक्रीस बंदी

विदेशी सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार वैज्ञानिक इशरा देणारे चित्र नसणाऱ्या विदेशी सिगारेट विक्रीस बंदी असतानाही त्यांची विक्री करणाऱ्या शहरातील तीन पानस्टॉलधारकांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ या सर्वांना अटक केल्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आली आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर रोडवरील रॉयल,इच्छामणी व टेस्टी बाईटस या पानस्टॉलवरील संशयित संतोष शिंदे (राक़्रांतीनगर, पंचवटी), आदर्श दास (रा़विनयनगर,नाशिक) व स्वागत धामणे (शंकरनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे बंदी असलेल्या विदेशी सिगारेटची विक्री करीत होते़ या सिगारेटच्या पाकिटावर कायद्यानुसार वैज्ञानिक इशारा असलेले चित्रदेखील नाही़
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्यान्वये या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़