शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर निवडून येणे अशक्य: गिरीश महाजन यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:21 IST

भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : भाजपमधून काही प्रमाणात बंडखोरी झाली असली तरी कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडून येणार नाही, असा दावा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार बाळासाहेब सानप यांनी बंडखोरी करून राष्टÑवादीत प्रवेश केल्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना महाजन यांनी सानप यांना थांबविण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच अद्यापही अर्ज माघारीला कालावधी असल्याने त्यांच्या माघारीसाठी पुन्हा प्रयत्न केले जातील, असेही महाजन यांनी सांगितले. कुणीही बंडखोर भाजपच्या उमेदवाराविरोधात उभा राहून निवडून येऊ शकणार नाही. आता तशी परिस्थितीच नसल्याने बंडखोरांनीदेखील त्याबाबत विचार करून माघारी घेणेच इष्ट असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. माघारी होईपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मनसेदेखील मैदानात उतरला असल्याने त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, घोडामैदान जवळच असून त्यातच निर्णय होईल, असेही महाजन म्हणाले.खडसेंच्या नाराजीचा विषय संपला एकनाथ खडसे यांच्या कन्येला उमेदवारी देण्यात आली आहे. खडसेंनीदेखील ती मान्य केली आहे. खडसेंच्या संमतीमुळे त्या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे खडसेंच्या नाराजीचा विषय संपला असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.पैसे घेऊन तिकीटवाटप भाजपत होत नाहीकुणाला तिकीट मिळाले नसल्याने त्यांचे कार्यकर्ते जरी आर्थिक गैरव्यवहारांमुळे तिकीट मिळाले नसल्याचा आरोप करीत असले तरी भाजपमध्ये अशाप्रकारे तिकीट वाटप होत नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे अशाप्रकारे कुणी आरोप करीत असतील, तर ते पूर्णपणे खोटे आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.गितेंची नाराजी दूरनाशिक मध्य मतदारसंघासह सर्वच मतदारसंघांमधून उमेदवारीसाठी चुरस होती. त्यात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली. इच्छुकांमधून एकालाच उमेदवारी मिळणे शक्य असल्याने इतर इच्छुक नाराज होणे साहजिक असते. त्याप्रमाणेच गितेदेखील नाराज झाले असले तरी ते आता इथे माझ्याबरोबर आणि पक्षासमवेत आहेत. त्यांची नाराजी दूर झाली आहे. ते पक्षाचे उपाध्यक्ष असून, पक्ष पुढे त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल ते ठरवेल, असेही महाजन म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन