गुन्हे संशोधनात विज्ञानाला महत्त्व
By Admin | Updated: January 19, 2015 00:26 IST2015-01-18T23:42:50+5:302015-01-19T00:26:05+5:30
मालवे : वावरे महाविद्यालयात कार्यशाळेचे उद्घाटन

गुन्हे संशोधनात विज्ञानाला महत्त्व
नाशिक : गुन्हे संशोधनात विज्ञान व त्यातल्या त्यात रसायनशास्त्राला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन फॉरेन्सिक सायन्स संस्थेचे संचालक डॉ. मालवे यांनी केले.
सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मविप्रचे संचालक डॉ. सुनील ढिकले यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बुद्धिमत्तेच्या संपत्तीत भारत हा जगातील अग्रेसर देश असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मसी महाविद्यालयाचे डॉ. अशोक पिंगळे यांनी औषधनिर्माण शास्त्रातील रसायनशास्त्राचे महत्त्व स्पष्ट केले. नानासाहेब महाले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी इनसेक्टिसाइड, पेस्टीसाइड, विविध संयुगांचा शेती व्यवसायात कसा उपयोग होतो, याविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा. डी. डी. जाधव यांनी कार्यशाळेची माहिती दिली. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे दत्ता पाटील, बोर्ड आॅफ स्टडीज्चे डॉ. कापडणीस, सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घुमरे, उपप्राचार्य एन. एम. शिंदे, प्रा. बी. पी. कुटे, संयोजक प्रा. डी. जी. शिंदे आदि उपस्थित होते. महाविद्यालयाची विद्यापीठ प्रतिनिधी अपर्णा पांडे हिने आभार मानले. (प्रतिनिधी)