पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:10 IST2019-09-09T14:10:28+5:302019-09-09T14:10:53+5:30
वडनेर भैरव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाडुमाती पासून बनविलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन सोमवारी करण्यात आले.

पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन
वडनेर भैरव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाडुमाती पासून बनविलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे विसर्जन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे तालुका संचालक उत्तमबाबा भालेराव, शालेय समिती अध्यक्ष पोपटराव पवार, मुख्याध्यापक के आर सोनवणे उपमुख्याध्यापक ए एस परदेशी , पर्यवेक्षक बी एम वाघ आदी उपस्थित होते. गणेश मूर्तीची विधिवत पूजा करून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या लेझीम पथक द्वारे मैदानामध्ये गणेशाची मिरवणूक काढण्यात आली .वाजत गाजत मुख्याध्यापक व पर्यवेक्षक व विद्यालयाच्या पंतप्रधान विद्यार्थी हरिष दांडेकर यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारातच एका पाण्याच्या टाकीमध्ये गणरायाला निरोप देण्यात आला व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे प्रदूषणमुक्त गणेश उत्सव कसा साजरा करावा हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.