शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

आयएमएतही कोविड उपचार केंद्राचा प्रस्ताव !

By संजय पाठक | Updated: April 8, 2021 17:23 IST

नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देनुतन अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांची माहितीजनजागृतीसाठी व्हीडीओ मालीका

नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले.

डॉ. सोननीस यांनी नुकतीच सुत्रे घेतली. कोरोनाचा दुसरा टप्पा असताना अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांनी सूत्रे स्विकारली आहेत. त्यानंतर लोकमतशी बेालताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील येाजनांची माहिती दिली.

प्रश्न- एका आव्हानात्मक स्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारत आहात, याबद्दल काय वाटते, या काळात कोणती नवी योजना आखली आहे.डॉ. सोननीस- कोरोना काळात म्हणजेच आव्हानात्मक काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या नाशिक शहरात सध्या सर्व डॉक्टर अत्यंत कठीण काळात समाजासाठी काम करीत आहेत. त्यांनाही अनेक अडचणी आहेत. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे आयएमए कार्यालयाच्या आवारात सध्या कोरोना चाचणी आणि लसीकरण दाेन्ही महापालिकेच्या सहकार्याने सुरू आहे. याठिकाणी बाल रूग्णालय असून सध्या कोविडमुळे ते बंद आहे. त्याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करता येईल काय याबाबत फिजीशियन्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रश्न- सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण आहे. त्याबाबत आयएमए समाजासाठी काय करू इच्छीते?डॉ. सोननीस- कोरोनाबाबत जनजागृतीची गरज आहे. सद्या जाहीर कार्यक्रमातून ते शक्य नसले तरी व्हीडीओ मालीका तयार करून ती लोकापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे.

प्रश्न- डॉक्टरांसाठी आणखी काय करण्याची योजना आहे.डॉ. साेननीस- काही चांगल्या येाजना आहेत परंतु कोविडनंतर त्या प्रभावीपणे राबवता येतील. डॉक्टरच नव्हे तर समाजातील विविध घटकांसाठी संतुलीत जीवनशैली कशी असावी यावर भर देण्यात येणार आहे. धावपळ खूप होते. त्याचा मनावर आणि आरोग्यावर प्रतिकुल परीणाम होतो. त्यामुळेच केवळ कामाचा ताण न घेता कुटूंब, छंदासाठी देखील वेळ दिला पाहिजे अशाप्रकारची संतुलीत जीवन शैली आरोग्यदायी ठरेल.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdocterडॉक्टर