आयएमएच्या कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST2021-04-06T04:14:31+5:302021-04-06T04:14:31+5:30

कोणत्याही सोहळ्याविना साधेपणाने मावळते अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांच्याकडून नूतन अध्यक्षांसह कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. या कार्यकारिणीत डॉ. विशाल गुंजाळ, ...

IMA executive takes over | आयएमएच्या कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

आयएमएच्या कार्यकारिणीने स्वीकारला पदभार

कोणत्याही सोहळ्याविना साधेपणाने मावळते अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे यांच्याकडून नूतन अध्यक्षांसह कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. या कार्यकारिणीत डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. उमेश नागापूरकर हे उपाध्यक्ष तर डॉ. विशाल पवार हे खजिनदार म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर डॉ. राजश्री पाटील या पुढील वर्षी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. या कार्यकारिणीत डॉ. अनिता भामरे या वुमन विंगच्या चेअरपर्सन तर डॉ. माधवी मुठाळ या सांस्कृतिक सचिव आणि डॉ. स्वाती वंजारी या सहसचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत. यावेळी बोलताना डॉ. सोननीस यांनी अत्यंत अवघड काळात मिळालेली ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या काळात आयएमएच्या माध्यमातून शासन, प्रशासन आणि सामान्य नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले, तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले रहावे, यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेणार असल्याचे नमूद केले. उपस्थितांच्यावतीने नूतन अध्यक्षांसह कार्यकारिणीच्या भविष्यातील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

फोटो

येणार आहेत.

Web Title: IMA executive takes over