मी सेल्फिश’ बेजबाबदार नागरिकांचा सेल्फी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:26 IST2020-04-17T21:52:24+5:302020-04-18T00:26:44+5:30
इंदिरानगर : संचारबंदी असल्याने नागरिकांनी घरातच थांबावे, असे वारंवार आवाहन करूनही नागरिक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून येत असल्याने अशा नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अनेक उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरानगर पोलिसांनी रस्त्यावर उगाचच फिरणाऱ्यांसाठी ‘सेल्फिश’ पॉइंट तयार केला आहे.

मी सेल्फिश’ बेजबाबदार नागरिकांचा सेल्फी
इंदिरानगर : संचारबंदी असल्याने नागरिकांनी घरातच थांबावे, असे वारंवार आवाहन करूनही नागरिक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून येत असल्याने अशा नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अनेक उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरानगर पोलिसांनी रस्त्यावर उगाचच फिरणाऱ्यांसाठी ‘सेल्फिश’ पॉइंट तयार केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरणाºया नागरिकांचे ‘मी बेजबाबदार; मी सेल्फिश’ असा मजकूर लिहिलेल्या फलकासमोर सेल्फी काढला जात आहे. महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरसचे बाधित रुग्ण वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून लॉकडाउनलोड वाढविण्यात आला आहे. नागरिक या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नसल्याने काहीजण विनाकारण हातात पिशवी घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी अनोखी शक्कल लढवून होल्ंिडग तयार केले आहे.
‘मी बेजबाबदार, मी सेल्फिश’ असा मजकूर लिहिलेला फलक रथचक्र चौकात लावण्यात आला आहे. याठिकाणी विनाकारण रस्त्यावर फिरणाºया नागरिकांचे छायाचित्र काढण्यात येत आहे.