अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:01 IST2020-09-15T23:51:21+5:302020-09-16T01:01:45+5:30
लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले.

अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
लोहोणेर : गिरणा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वासोळ येथील दोन ट्रॅक्टर अनधिकृत गौनखिनज वाहतूक करताना विठेवाडी येथील तलाठी नितीन धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने पकडले.
ट्रॅक्टर वासोंळ येथून वाळू भरून कळवण तालुक्यातील निवाने येथे जात असताना विठेवाडी येथे ट्रॅक्टर भरारी पथकास आढळून आली. ही दोन्हीही ट्रॅक्टर तहसील कार्यालय देवळा येथे जमा करण्यात आली असल्याची माहिती तलाठी
धोंडगे यांनी दिली. यामुळे वाळू तस्करी करणार्याचे मात्र धाबे दणाणले आहे. या भरारी पथकात नितीन धोंडगे तलाठी, विठेवाडी पोलीसपाटील, गवळी भाऊसाहेब, पुरुषोत्तम पाटील तलाठी, जिभाऊ कोतवाल आदींचा समावेश होता.