अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:27 IST2018-07-12T23:12:27+5:302018-07-13T00:27:41+5:30
मालेगाव : शहरालगतच्या सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून जप्त केले आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतूक; मालेगावी ट्रॅक्टर जप्त
मालेगाव : शहरालगतच्या सवंदगाव शिवारातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणारे चार ट्रॅक्टर अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून जप्त केले आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली व वाळूसह आठ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सवंदगाव शिवारात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ट्रक (क्र. एमएच ४१ टी २७३१) व विनाक्रमांकांचे तीन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी फरार ट्रॅक्टरमालक शेख रुबाब शेख दादामिया, अमोल नानाजी गायकवाड, अन्सारी हमीदुरहेमान, सुभाष कारभारी शेवाळे यांच्या विरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.