उमराणेसह परिसरात अवैध गावठी दारु भट््ट्या उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:10 IST2017-12-01T13:09:53+5:302017-12-01T13:10:02+5:30

उमराणे : येथील परसुल नदीपात्रातील अवैध गावठी दारु चे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शुक्रवारी उध्वस्त करण्यात येऊन धाडीत सुमारे ८५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला आहे

 Illegal ammunition busts in the area along with Umraon | उमराणेसह परिसरात अवैध गावठी दारु भट््ट्या उध्वस्त

उमराणेसह परिसरात अवैध गावठी दारु भट््ट्या उध्वस्त

उमराणे : येथील परसुल नदीपात्रातील अवैध गावठी दारु चे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शुक्रवारी उध्वस्त करण्यात येऊन धाडीत सुमारे ८५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला आहे .परसुल नदीपात्रातील अवैध दारु हातभट्ट्यांवर धाडी टाकत दारु तयार करण्यासाठी लागणारे २७०० लिटर रसायन व त्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकुण ८५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करु न त्याची नासधूस करण्यात आली. या मोहीमेत उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक आय.एन.वाघ, विलास बामणे, दुय्यम निरीक्षक पी.बी.अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर गरु ड, महेंद्र बोरसे, संतोष कडलग,अवधुत पाटील, पांडुरंग वाईकर यांनी कारवाई केली.

Web Title:  Illegal ammunition busts in the area along with Umraon