शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सिनेस्टाइल पाठलाग करून रोखली अवैध मद्यसाठ्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 17:37 IST

चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्दे८ लाख ४२ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्तमद्यबाटल्या ठेवण्यासाठी खास तजवीज

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभाग असो किंवा सीमावर्ती भागांमधील तपासणी नाक्यांवरील पोलीस असो त्यांच्या नजरेतून सहजरीत्या मार्गस्थ होता यावे, तपासणीदरम्यान कोणाचाही संशय बळावू नये, यासाठी एका पॉश पांढऱ्या रंगाच्या टाटा सफारी कारमधून चोरट्या मार्गाने अगदी सफाईदारपणे चोरकप्पे तयार क रून त्यामधून मद्याच्या बाटल्यांची केली जाणारी वाहतूक रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या क्रमांक एकच्या भरारी पथकाला यश आले. पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे ८ लाख ४२ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दादरा नगरहवेली या कें द्रशासित प्रदेशामध्ये विक्रीस मान्यता असलेल्या विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्यांचा साठा हरसूल-गिरणारेमार्गे शहरातून एका पांढ-या रंगाच्या पॉश टाटा सफारीमधून वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय खात्रीशिर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गिरणारे गावात प्रथम सापळा लावला. हरसूल-वाघेरा घाटमार्गे गुजरातकडून टाटा सफारी कार (एमएच ०३, एएम ५०७०) भरधाव वेगाने येताना दिसली. पथकाने त्यास थांबण्याचा इशारा केला, मात्र कारचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत गिरणारे शिवारात कार थांबविली नाही. कारचा वेग अधिक वाढवून दुगाव-दरी- मातोरी रस्त्याने मखमलाबादमार्गे थेट पेठरोडच्या दिशेने दामटविली. दरम्यान, सिनेस्टाइल पाठलाग करत असताना कारचालकासह मालकाने पथकाला चकमा देत कार पेठरोड जकात नाक्यापर्यंत आणली आणि पोबारा केला. पाठलाग करणाºया पथकाला बेवारसस्थितीत कार रस्त्यालगत आढळली. पथकाने कारची प्रथमदर्शनी पाहणी केली, मात्र कारमध्ये काहीही आक्षेपार्ह माल आढळून आला नाही, मात्र जेव्हा कारच्या सीटखालील पोकळ भाग तपासला असता मद्याच्या लहान-मोठ्या बाटल्या आढळून आल्या. अज्ञात ट्रकचालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यबाटल्या ठेवण्यासाठी खास तजवीजचालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आले. हा सर्व पत्रा कर्मचा-यांनी कापून काढला असता संपूर्ण वाहन मद्याच्या बाटल्यांनी भरलेले असल्याचे आढळून आले. दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, सुत्रावे, जवान धनराज पवार, श्याम पानसरे, विलास कुवर, सुनील पाटील, मच्छिंद्र अहिरे आदींनी कारची झाडाझडती घेतली.--

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागNashikनाशिकalcohol prohibition actदारुबंदी कायदाCrime Newsगुन्हेगारी