विहिरीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: July 5, 2017 00:31 IST2017-07-05T00:30:22+5:302017-07-05T00:31:13+5:30
नाशिकरोड : बालकाचा खेळत असताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

विहिरीत पडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोडकॅनॉलरोड झोपडपट्टीतील सहा वर्षाच्या बालकाचा मंगळवारी सायंकाळी घराजवळच खेळत असताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
बबलू इस्माईल शेख असे या बालकाचे नाव असून, तो आपल्या मित्रासोबत मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास खेळत होता. घराजवळच गोसावी मळ्यात कथडा नसलेल्या धोकादायक विहिरीजवळ खेळत असताना तो विहिरीत पडला. बबलू पडल्यानंतर त्याच्या सोबत खेळत असलेल्या मुलांनी लागलीच सदर बाब आपल्या व बबलूच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर विहिरीजवळ मोठी गर्दी जमली होती. मनपा अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत शोध कार्यास सुरुवात
केली. मात्र विहिरीत तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ, घाण साचली असून पाणीदेखील असल्याने बबलूचा शोध लागत नव्हता. रात्री विद्युत दिवे लावून शोध सुरू असताना सुमारे दहा वाजता बालकाचा मृतदेह हाती लागला.