वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 19:43 IST2019-05-16T19:43:15+5:302019-05-16T19:43:29+5:30
लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो. दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे

वाळू चोरीचे प्रमाण वाढूनही त्याकडे दुर्लक्ष्य
लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्टरचा दणदणाट सुरू असतो.
दररोज हजारो ब्रास गौण खिनज चोरीला जात असताना संबधित यंत्रणा सुस्त कशी व नेमकी ही वाळू तस्करी कोणाच्या मेहरबानीमुळे चालू आहे याचीच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लोहोणेर येथील वाळू तस्कर भैय्या निकम याला अटक झाली नंतर लोहोणेर येथील वाळू चोरीला आळा बसेल असे वाटत होते. मात्र त्या नंतर अनेक वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. तर काही महाभाग भाड्याने ट्रॅक्टर आणून कमिशनवर वाळूचा धंदा करतात काहींनी बाहेरगावाहून ट्रॅक्टर आणून वाळू उपसा सुरू केला आहे.
वाळू उपसा मुळे भरमसाट पैसा मिळत असल्याने ह्या धंद्याकडे तरु ण पिढीचा कल दिवसेंदिवस वाढतच असून याला कोणीही थांबवू शकत नाही. इतर ठिकाणी वाळू तस्करावर किंवा वाळू चोरीला अटकाव केल्याचे सांगितले जाते मग गिरणा नदी पात्रातून होणार्या वाळू चोरीवर का कारवाई केली जात नाही. याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. जरी काही प्रमाणात सदर कारवाई झाली तरी सदरचे वाळू चोरी करणारे वाहन कोणाच्या तरी मेहरबानीने संबधित यंत्रणा अथवा अधिकाऱ्यांवर दबाव आणून सोडले जात असते ही वस्तुस्थिती आहे.
मग ही वाळू चोरी थांबेल कशी हा संशोधनाचा विषय असला तरी पाणी टंचाई निर्माण झाली म्हणजे सर्वच बोबा मारतात मग रात्रीच्या वेळी बेसुमार पणे होणार्या वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्रात मोठमोठी खड्डे पडल्याने पाण्याची पातळी खाली जात आहे.
याकडे का सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.
गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून याचे कोणासही सोयरसुतक नाही हेच यामुळे स्पस्ट होत असले तरी या बेसुमार वाळू उपशा मुळे गिरणा पात्र विद्रुप व उजाड होत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात आहे. यास हीच बाब जबाबदार आहे हे ही तितकेच महत्वाचे आहे.