शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत तीन दिवस रंगणार होती, चक्क हवाई बेटांसारखी रेव्ह पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 08:28 IST

बॉलीवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; अभिनेत्री हीना पांचालसह २२ जणांना पोलीस कोठडी, सव्वा लाखाचा मद्यसाठा जप्त

ठळक मुद्देदोन खासगी बंगल्यात पीयूष सेठियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इगतपुरीतील रेव्ह पार्टीसाठी बॉलिवूडशी संबंधित दोन कोरिओग्राफर अन‌् अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या २२ व्यक्तींचा समूह इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये थेट तीन दिवसांच्या मुक्कामाला आलेला होता. या हायप्रोफाईल नशेबाजांच्या समूहाने ‘हवाईयन’ संकल्पनेवर अधारित तीन दिवसीय रेव्ह पार्टीचा बेत आखला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली आहे. अभिनेत्री हीना पांचालसह अन्य ११ महिला आणि सहा पुरुषांना एक दिवसाची तर चौघा पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

दोन खासगी बंगल्यात पीयूष सेठियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. सोमवारी २२ जणांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आरोेपींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. आरोपींनी एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारू रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरून पोलिसांनी निष्पन्न केले आहे. तसेच तेवढ्याच किमतीचा सीलबंद मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

हीना पांचाल मुख्य आकर्षणहवाई बेटांप्रमाणे ‘हवाईन थीम’च्या धर्तीवर रंगलेल्या या रेव्ह पार्टीचे मुख्य आकर्षण बॉलिवूडची अभिनेत्री हीना पांचाल हेच होते. पार्टीत ड्रग्ज, कोकेन, गांजा, चरससारख्या नॉर्कोटिक्स पदार्थांचे सर्रासपणे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असल्याचे पोलिसांना आढळले. 

काय आहे ‘हवाईयन पार्टी’?‘हवाईयन’ अर्थात हवाई बेटांवरील संस्कृतीला साजेशा संकल्पनेवर अधारित ही पार्टी असते. यास ‘लुलु पार्टी’सुद्धा म्हटले जाते. रंगीबेरंगी फुलांची डिझाईन असलेले कमी-कमीत कपडे या पार्टीमध्ये घातले जातात. हवाई नावाचे उष्ण वातावरण असलेले बेट आहे. त्यामुळे तेथे लोक कमी कपडे घालतात.

‘हीना’ला दाखविला खाकीचा धाककारवाईवेळी हीना पांचाल हिच्या सेलिब्रिटी ॲटिट्युडचा पोलिसांना सामना करावा लागत होता. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत हीनाला दम भरल्यानंतर ती शांत झाली. त्यानंतर तिने तपासकार्यात सहकार्य केले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीHeena Panchalहिना पांचाळ