इगतपुरीत ऑईल मिलला आग, लाखो रूपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:21 IST2019-01-03T12:21:13+5:302019-01-03T12:21:26+5:30
इगतपुरी : शहरातील बाफना ऑईल मिलला गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

इगतपुरीत ऑईल मिलला आग, लाखो रूपयांचे नुकसान
इगतपुरी : शहरातील बाफना ऑईल मिलला गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत बाफना ऑईल मिल पूर्णपणे जळुन खाक झाली असून लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असुन या आगीत सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.
गुरु वारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवाबाजार पेठेतील जुनी बाफना ऑईल मिलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीचे काही वेळात आगीचे मोठे तांडव झाले होते. आगीचे मोठ मोठे गोळे बाहेर पडत असल्याने तात्काळ येथील मालक बाफना यांना माहिती पडताच आरडा ओरडा केली. यावेळी आजू बाजूचे नागरिक गोळा होऊन लगेच इगतपुरी नगरपरिषद व जिंदाल कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. मात्र आगीत बाफना ऑईल मिलमध्ये असलेले तेलाचे डबे व कीराणा सामान पुर्णपणे जळुन खाक झाल्याने लाखो रु पयांचे रु पयांचे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांनी थंडीत भल्या पहाटे मदत केली.