शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

"तू माझी प्रेयसी झाली नाही तर तुझा...", अशोक खरातचे कारनामे येऊ लागले समोर, महिलेवर दोन वेळा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:13 IST

Ashok Kharat Nashik Video: भविष्य आणि अध्यात्माच्या आडून महिलांसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या अशोक खरात या भोंदूचे कारनामे समोर आले आहेत. त्यात त्याने अनेक महिलांना भीती घालून बळजबरी संबंध ठेवायला भाग पाडले.

Ashok Kharat News Marathi: अशोक खरातची काळी कृत्ये आता समोर येऊ लागली आहेत. त्याने अनेक महिलांना जबळजबरीने, गुंगीचे औषध देऊन संबंध ठेवायला भाग पाडले. एका महिलेला तर तू माझी प्रेयसी झाली नाहीस, तर तुझा नवरा ईश्वराचा प्रकोप होऊन मरेल, अशी भीती घातली आणि तिच्यावर बलात्कार केला.  

 अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नोव्हेंबर २०२२ साली पीडिता विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी बाबाने ही संधी साधून कार्यालयातील चेंबरमध्ये बोलावून घेतले. 

...तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल 

प्रसाद म्हणून पेढा खाण्यास दिला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात असलेले पाणी पाजले. त्यामुळे पीडितेला गुंगी आली आणि डोके जड पडले. यावेळी बाबाने तिच्यासोबत अंगलट करत 'तू माझी प्रेयसी बनून राहिली नाही, तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल, मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे' असे सांगून भीती घालून बळजबरी करून शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महिलेला म्हणाले, 'तुला माझ्याकडे येऊन विधी कराव्या लागतील'

संशयित अशोक खरात याच्यासोबत पीडितेची ओळख २०१९ साली कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झाली होती. त्यावेळी सोबत तिचे दाजीदेखील होते. 'मला दैवीशक्ती प्राप्त असून, त्या शक्तीच्या सामर्थ्याने मी तुझ्या आयुष्यात असलेले अडथळे दूर करतो. तुझे श्रीमंत घराण्यात लग्न होईल, तुझे करिअरदेखील घडेल, त्यासाठी तुला माझ्याकडे येऊन काही विधी कराव्या लागतील' असे सांगून युवतीचा विश्वास संपादन केला होता.

२०२१ साली पीडितेचा साखरपुडा गावाकडे झाला. नंतर तो मोडला तेव्हा खरातने पुन्हा धीर देत ५० हजार रुपये रोख घेत 'पुष्कराज'चा खडा दिला. 'हा खडा 'सिद्ध' करून दिला असून, तो पुन्हा गळ्यात घालण्यास सुरुवात कर, तुझे कल्याण होईल' असे सांगितले. 

पतीसोबत आलेल्या महिलेवर कार्यालयातच बलात्कार

२०२२ साली दुसऱ्यांदा लग्नाचे स्थळ आले आणि पीडितेचा साखरपुडा होऊन लग्नसोहळाही पार पडला. लग्नाची बातमी खरात यास सांगितल्यावर त्याने जोडीने आशीर्वाद घेण्यासाठी पीडितेला कार्यालयात बोलावून घेतले आणि पुन्हा त्याच पद्धतीने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Kharat accused of rape after failed love proposal.

Web Summary : Ashok Kharat allegedly raped a woman after she refused his advances, threatening her husband's death. He exploited her faith, using drugs and false promises of divine intervention to assault her repeatedly, even after her marriage.
टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी