अजून दोन दिवस असेल पावसाची हजेरी
By Admin | Updated: May 29, 2014 00:44 IST2014-05-29T00:21:26+5:302014-05-29T00:44:15+5:30
हवामान खात्याचा अंदाज : मंगळवारी झाला १२ मि.मी. पाऊस

अजून दोन दिवस असेल पावसाची हजेरी
हवामान खात्याचा अंदाज : मंगळवारी झाला १२ मि.मी. पाऊस
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ात मान्सूनपूर्व पावसाने वादळीवार्यासह हजेरी लावली. अजून दोन दिवस पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या मंगळवारपासून शहरासह जिल्ात रोहिणी नक्षत्रातील मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी वादळीवार्यासह गारांचा पाऊस झाला, तर बुधवारी पुन्हा वादळीवार्यासह पाऊस झाला. त्यामुळे शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे दोनशेपेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच झोपडपी परिसरातील घरांचे पत्रेही उडून गेल्याने नुकसान झाले. येत्या दोन दिवसांत पुन्हा पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याचा अंदाज मंुबईच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे.