शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

...तर नाशिकच्या मेंदू मृत रुग्णाचे हृदय चेन्नईत धडधडले असते !

By azhar.sheikh | Published: February 25, 2018 11:40 PM

भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले.

ठळक मुद्दे पुरेशा इंधनअभावी विमानोड्डाण रद्द यकृत-मूत्रपिंडाने दिले जीवदान‘ग्रीन रोड कॉरिडोर’द्वारे यकृत व एक मूत्रपिंड रुग्णवाहिकेतून रवाना

नाशिक : रक्ताभिसरणाचे मुख्य कार्य पार पाडणारे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव दान करणारा दाता एका गरजूला लाभला आणि गरजूच्या नातेवाइकांनी थेट चेन्नईमधून एअरग्रीन कॉरिडोरसाठी तयारीही दर्शविली; मात्र दिल्लीहून विमान उड्डाण झाले तरी परतीच्या प्रवासासाठी ओझर विमानतळावर रविवारमुळे इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध होण्याबाबत संभ्रम असल्याचे समजल्याने विमानोड्डाण रद्द करण्यात आले; परिणामी दात्याचे हृदय गरजू रुग्णाच्या शरीरात धडधडले नाही.भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. हृदयाचा प्राप्तकर्ता चेन्नई राज्यात असल्याची माहिती मिळाली. तेथून सदर गरजूच्या कुटुंबीयांनी एअरग्रीन कॉरिडोरची तयारी दर्शविली; मात्र रविवार असल्याने नाशिकच्या ओझर विमानतळावरून पुन्हा ‘टेक-आॅफ’करिता इंधनाची निकड पूर्ण होणार नसल्यामुळे विमानाचे उड्डाण होऊ शकले नसल्याची माहिती चेन्नई शहरातील अवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक एल. सतीश यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वैद्यकशास्त्रानुसार हृदयाचे प्रत्यारोपण तीन तासांत होणे आवश्यक आहे; मात्र दिल्लीहून नाशिकला विमानाला पोहचण्यास किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागणार होता आणि त्यानंतर पुरेशा इंधनअभावी परतीचा प्रवास करणे शक्य नसल्यामुळे संबंधितांनी दिल्लीहून विमानोड्डाण करण्याचा धोका पत्कारला नाही. सुरुवातीला चेन्नई येथून हालचाली सुरू झाल्यानंतर थेट ओझर विमानतळाच्या परवानगीसाठी संपर्क साधला गेला; मात्र परवानगीबाबत प्रथमत: नकार दर्शविला गेल्याची माहिती अ‍ॅरोमेट इंटरनॅशनल रेस्क्यू सर्व्हिसेसचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

यकृत-मूत्रपिंडाने दिले जीवदानकोठुरकर यांचे एक यकृत व दोन मूत्रपिंडांमुळे दोघांना जीवदान तर नेत्रांमुळे दृष्टीबाधितांना नवी दृष्टी लाभली. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येथून ‘ग्रीन रोड कॉरिडोर’द्वारे यकृत व एक मूत्रपिंड रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले. नाशिक शहर वाहतूक शाखा, ग्रामीण महामार्ग पोलीस, अहमदनगर ग्रामीण पोलीस व पुणे ग्रामीण-शहर पोलिसांनी एकत्रपणे हा कॉरिडोर पूर्ण करत रुग्णवाहिका सुरक्षितपणे पुण्याच्या रुग्णालयापर्यंत अवघ्या तीन तासांत पोहचविली.

 

टॅग्स :Organ donationअवयव दानNashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीस